Ad will apear here
Next
अक्षय्य आनंदाचा ‘केशरी’ ठेवा
आपल्या केशर आंब्याच्या बागेत राजाराम वाघमारे

सोलापूर : अक्षय्यतृतीयेचे आणि आंब्याचे विशेष असे नाते आहे आणि आंबे म्हटले, की पहिल्यांदा डोळ्यांसमोर कोकणच उभे राहते. मग भले आंब्याचे पीक देशाच्या, राज्याच्या अनेक भागांमध्ये येत का असेना? कोकणातील या वैभवाची भुरळ सगळ्यांनाच पडते; पण त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या प्रदेशातही तसे निर्माण करण्याची किमया फार थोड्या साधते. बाभूळगाव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील एका निवृत्त शिक्षकाने ही किमया साध्य केली आहे. राजाराम वाघमारे असे त्यांचे नाव असून, त्यांनी आठ वर्षांच्या अथक परिश्रमांतून सोलापुरातल्या माळरानावर कोकणासारखी आमराई उभी केली आहे. त्यांच्या केशर आंब्याच्या बागेत यंदा पहिल्यांदाच बहर आला असून, अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर फळांची विक्री सुरू झाली आहे.  

वाघमारे हे राज्य पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षक. कोकणात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. नोकरीच्या निमित्ताने कोकणातच निम्मे आयुष्य घालवलेल्या वाघमारे यांच्यावर तेथील निसर्ग आणि आंब्याच्या बागांचा प्रभाव पडला होता. मुळातच त्यांना लहानपणापासूनच वृक्षलागवड-संवर्धन, पर्यावरण संरक्षण या गोष्टींमध्ये रस होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवा काळात कोकणातील अनेक गावांत विद्यार्थांची श्रमसंस्कार शिबिरे घेऊन ग्रामस्वच्छता, जलसंधारण आणि वृक्षलागवड असे उपक्रम राबवले. त्यातूनच त्यांना आपल्या गावाकडच्या शेतात आमराई विकसित करण्याची कल्पना सुचली. त्यांनी निवृत्तीनंतर गावाकडचा रस्ता धरला तो हे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवूनच. 

स्वतःची आमराई असावी या स्वप्नामागे आणखी एक हेतू होता तो पर्यावरणसंरक्षणाचाही. हे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले तीन एकर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड करून. या क्षेत्रावर त्यांनी ६०० झाडे लावली आणि ती प्रतिकूल परिस्थितीत, प्रसंगी पाणी विकत घेऊनही जगवलीही. गेल्या वर्षी पडलेल्या मोठ्या दुष्काळावेळी स्वतःच्या पेन्शनमधील ८० हजार रुपयांचे पाणी विकत घेऊन त्यांनी बाग वाचवली. आज त्यांचे वय ७१ वर्षे आहे. वयोमानानुसार फारशी धावपळ करता येत नसली, तरी बागेतील केवळ कष्टाच्या कामांसाठीच त्यांनी मजूर लावले आहेत. बाकीची दैनंदिन देखभालीची कामे ते स्वतःच करतात. त्याचा त्यांना आरोग्य चांगले राहण्यासाठीही फायदा झाल्याचे ते सांगतात. एवढेच कशाला, बागेला पाणी देण्याचे कामही ते स्वतःच करतात. त्यासाठी वीज रात्री-अपरात्री केव्हा येईल तेव्हा विहिरीवरील मोटार सुरू करायलाही ते हौशीने जातात. अक्षय्यतृतीयेच्या पूर्वसंध्येला त्यांच्या बागेतील केशर आंब्याला स्थानिक बाजारपेठेत प्रति डझन २०० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. 

वास्तविक, वाघमारे यांच्या कुटुंबाला उत्पन्नासाठी शेती करण्याची आवश्यकता नाही; मात्र कोकणाच्या प्रभावामुळे पाहिलेले स्वप्न आणि आपल्या भागात पर्यावरणरक्षणाचा ध्यास यामुळे त्यांनी ही आमराई लावली आणि कष्टाने वाढवलीही. आपल्याला स्वप्नपूर्तीचे समाधान असल्याची भावना त्यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना व्यक्त केली. जणू काही अक्षय्य आनंदाचा ‘केशरी’ ठेवाच त्यांना या आमराईच्या रूपाने मिळाला आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZABBB
Similar Posts
यंदा केशर आंब्याला भाव सोलापूर : यंदा राज्यातील विविध भागात झालेल्या गारपीट व वादळामुळे आंब्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलेला केशर आंबा यंदा जास्तच भाव खाव खात आहे. सोलापूर व पंढरपुरच्या बाजारपेठेत जंबो केशर पाचशे ते सहाशे रुपये डझन, तर नेहमीचा केशर आंबा तीनशे ते चारशे रूपये डझन विकला गेला आहे
आखाजीचा मोलाचा सन देखा जी.... आखाजी म्हणजेच अक्षय्यतृतीया! उन्हाचा कहर वाढत असतो, जिवाची लाही लाही होत असताना आखाजीच्या सणाची तयारी स्त्रिया मोठ्या उत्साहानं करतात. आखाजीचा सण खानदेशात विशेष रूपानं साजरा होतो. बहिणाबाई आपलं रोजचं जगणं आपल्या गाण्यांमधून गात असत. यशवंत देवांसारख्या श्रेष्ठतम संगीतकाराने आपल्या प्रतिभावान संगीतकलेचा
मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट सोलापूर : मूकबधिर विद्यार्थांना वाचासिद्धीसाठी रोपळे (पंढरपूर) येथील सुप्रभात ग्रुपतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामुहिक श्रवण यंत्र भेट दिले.
पक्ष्यांसाठी व्यवस्था पिण्याच्या पाण्याची पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात निसर्ग व पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दल चांगलीच जनजागृती झाली आहे. त्याची प्रचीती सध्या येत आहे ती पक्ष्यांना ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यांवरून. नुकत्याच झालेल्या वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी मारलेल्या फेरफटक्यावेळी ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. सध्याच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language